जगी धन्य ही टाकळी पुण्य भूमी । अनुष्‍ठान केले असे रामनामी । असंख्यात सामर्थ्य गोमय मारुतीचे । गोदा तटी हे स्थान जागृतीचे ॥

वाङमय

   प्रकाशात आलेले आणि प्रसिध्द झालेले श्री समर्थांचे वाङमय सुध्दा खूप आहे. त्यामधे मराठी तसेच उर्दु लिखाणाचा पण वाटा आहे. मुख्य लिखाण म्हणजे दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक, करुणाष्‍टके, निरनिराळ्या देवतांच्या आरत्या, पोवाडे, भारुडे असा सर्वांचा त्यात समावेश आहे. ह्‍यातील दासबोधाची मूळ प्रत श्री समर्थ शिष्‍य श्री कल्याणस्वामी ह्‍यांच्या डोंबगाव येथील मठात उपलब्ध आहे. तसेच मनाचे श्लोक श्री समर्थांनी शिवाजी महाराजांना लिहीले पत्र, महाराजांनी श्री समर्थांना लिहीलेले पत्र, श्री समर्थांनी संभाजी राजांना लिहीलेले उपदेशार्थ पत्र असे मूळ दस्त्‍आऐवज वाग्‌देवता मंदिर धुळे येथे अतिशय काळजीपूर्वकपणे, व्यवस्थित त्यांचे अमूल्य महत्व जाणून जतन करुन ठेवण्यात आले आहेत. हे सर्व वाङमय श्री समर्थांनी सांगितले आणि श्री कल्याण स्वामींनी आपले हस्ताक्षरात लिहून काढले. परंतू ह्‍याचे पेक्षा महत्वाचे आणि मौल्यवान असे श्री समर्थांच्या तपश्चर्येच्याकाळात टाकळीत वास्तव्य असतांना त्यांनी संपूर्ण रामायणाचे सात खंड स्वत:चे हस्ताक्षरात लिहीले आहेत. हा सर्व राष्‍ट्राचा अमूल्य ठेवा सुध्दा श्री समर्थ वाग्‌देवता मंदिरात व्यवस्थित जतन करुन ठेवला आहे.



   विजापूरचा सरदार औरंगजेब जेव्हा शिवाजी महाराजांना पकडण्यास महाराष्‍ट्राच्या स्वारीवर निघाला तेव्हा गुप्ततेचा उपयोग करुन लिहीलेल्या पत्राचा नमुना तसेच शिवराज्याभिषेक झाल्यावर श्री समर्थांना आपले जीवन कार्य सफल झालेल्या आनंदाचे "आनंदवन भुवन" हे काव्य सुध्दा सुप्रसिध्द आहे. श्री उध्दव स्वामी यांनी बरीच मोठी वाङमय निर्मीती आहे. ते बहुतेक सर्व लिखाण धुळे येथील श्री समर्थ वाग्‌देवता मंदिरात अतिशय व्यवस्थितपणे जतन करुन ठेवले आहे. त्या सर्व वाङमयाचा अभ्यास करुन विषयवारी प्रमाणे नोंद करुन त्या लिखाणाची सूची वगैरे करण्यासाठी अभ्यासू भाविकांची नितांत आवश्‍यकता आहे. अशा प्रकारे काम करण्याची इच्छा असणाऱ्या भाविकांनी ट्रस्टशी संपर्क साधावा.