जगी धन्य ही टाकळी पुण्य भूमी । अनुष्‍ठान केले असे रामनामी । असंख्यात सामर्थ्य गोमय मारुतीचे । गोदा तटी हे स्थान जागृतीचे ॥

टाकळीविषयी

जेथे नारायण ठोसर यांचे व्यक्तिमत्व श्री समर्थ रामदास स्वामी असे घडले, ती पुण्यभूमी म्हणजे श्री क्षेत्र आगरटाकळी (नाशिक)

राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी सन १६२० ते १६३३ असे शमारे १२ वर्ष श्री क्षेत्र आगरटाकळी येथील गुडेत राहिले, श्री समर्थांनी पहिला मठ श्री क्षेत्र आगरटाकळी येथे स्थापन केलेला आहे.श्री समर्थांनी त्यांचे निवास काळात त्याचे निवास गृहेपासून जवळ असलेल्या गोदावरी व नंदिनी नदीचे संगमावर पुर्वरण केलेले आहे. श्री समर्थांनी रथ साममी सन १६२० मध्ये पुरक्षरणास प्रारंभ केला. उद्धवस्वामी हे श्री समर्थांचे पहिले शिष्य होय, श्री कषेत्र आगरटाकळी येथेच श्री समर्थांचे पहिले शिष्य श्री संत उद्धवस्वामी श्री समर्थाच्या सानिध्यात व संपर्कांत आले होते, श्री संत उद्धभवस्वामी हे शेवटपर्यंत म्हणजेच वयाचे ८६ वर्षापर्यंत श्री समर्थ मठाचे व गोमय मारुतीचे सेवेत राहिलने. मठाजवळच गोदावरी नदीकाठी श्री उद्धवस्वामीची समाधी आणि नंतरच्या ७ शिष्यांच्या समाध्या आहेत. उद्धवस्वामींच्या समाधीच्या वेळी श्री समर्थ शिष्य श्री कल्याणस्वामी टाकळी येथे उपस्थित होते. श्री रामदास स्वामी यांनी स्वहस्ते स्थापित केलेला गोमय (शेण), गोमित्र, गाईच्या शेणाची गोवरीची राख यापासुन तयार केलेला व स्थापित केलेला गोमय मारुती टाकळी मठात विराजमान आहे. अशी भाविकांची अद्धा आहे. म्हणजेच समर्थांचे प्रथम निवासस्थान गुहा, पहिला शिष्य, पहिले पुरश्चरण, पहिला मठ, हे श्री क्षेत्र दाकळी येथील आहे. श्री समर्थानी आगरटाकळी मठात वाल्मिकी रामायणाचे ७ पेकी ५ कांड, करुणाष्टके २१ समासी जुना दासबोध असे लिखाण हे स्वहस्ते लिहीलेले आहे. या सर्वामुळे पुण्यक्षेत्र श्री क्षेत्र

आगरटाकळीचे महत्व श्री समर्थ रामदास स्वामीचे जिवनात अनन्य साधारण असे आहे. श्री समर्थ रामदास स्वामी यांचे मुळ नांव नारायण सुर्याजीपंत टोसर असे होते. सूर्य उपासक ठोसर कुटुंबात श्री समर्थाचा जन्म वडील सुर्याजीपंत आणि माता सौ. राणुबाई यांचे पोटी रामनवमी चैत्र शु.९ शके १५३० रोजी संभाजीनगर (औरंगाबाद) जवळील जांब या गावी झाला. त्यांचे नाव नारायण असे ठेवण्यात आले. लहानपणापासुनच त्यांची वृत्ती धार्मिक स्वरुपाची होती. नारायणाचे आई वडीलांनी नारायणाचे लग्न जांब जवळील आसनगावचे भानाजीपंत बोधलेपूरकर (सौ.राणुबाईचे बंधु) यांचे मुलीशी ठरवले होते. बोहल्यावरील नारायणाने मंगलअष्टकातील सावधान सावधान शब्दाचा अर्थ लक्षात घेतला. बोहल्याबरील नवरदेव नाहीसा झाला, नवरदेव नारायणाने गोदामाईचा काठ गाठला. आणि आसनगांव ते नाशिक पायी प्रवास करीत आगरटाकळी पंचवटीत पोहोचले. स्यानंतर नारायणाने श्री रामराया, श्री मारुतीरायाचे चरण कमलांवर स्वत:ला झोकुन दिले. आगरटाकळी गावाजवळील दसक- पंचक गावचे गिरीधरपंत कुलकर्णी यांना नारायणाने नवसंजीवनी प्राप्त करुन दिली. गिरीधरपंत आणि सौ. अन्नपूर्णाबाई यांना जो पुत्र झाला नंतर तोच पुत्र नारायणा जवळ राहु लागला. त्याचे नाव नारायणाने उद्धव असे ठेवले. पुढे कुलकर्णी कुटुंबाला १० पुत्र झाले. त्यावरुन त्यांचे नाव दशपुत्रे असे झाले. दशपुत्रे घराण्याचे बंशज आजही नाशिक व त्र्ंबकेश्वरी रहातात. श्री समर्थ आगरटाकळी येथुन देशाटनास निघण्याच्या अगोदर त्यांनी गोमय मारुतीची स्थापना टाकळी मठात केली, श्री

समर्थांनी स्वस्ते उद्धवास श्रीफळ व महावर्त्र देऊन मठाधिपती आडिर केले. त्यामुळे त्यांचे स्मरणार्थ मठाच्या जिर्णान्धाराच्या वेळी মरुयसभागृहाचे नामकरण श्री उद्धवस्वामी सभागृह असे आदराने अद्धेने केलेले आहे. श्री श्रीमंत रघुनाथराव (राघोबादादा) पेशवे सन १७७५/७६ साली दर्शनासाठी टाकळीस आले होते. श्री श्रीमंत बाळाजी बाजीराव (नानासाहेब) पेशवे ह्यांनी धनत्रयोदशी सन १७५३ रोजी संपुर्ण आगरटाकळी गांव, मठ देवस्थानास इनाम करुन दिली व तशी सनद दिली. विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवरांनी आगरटाकळी येथे भेट देऊन श्रीरामराया, गोमय मारुतीराया, श्री समर्थ रामदास स्वामी यांचे दर्शन, आशीर्वाद घेतले आहेत. महाराष्ट्र शासनाचे पर्यटन विभागाने मठास क वर्ग प्रदान केला आहे. श्री समर्थ रामदास सेवा मंडळाने मठाचे अनेक वर्ष उत्तम सेवा कार्य केलेले आहे. विद्यमान परीस्थितीत मठाधिपती पुजारी यांचेमार्फत देवस्थानची देखभाल होत असतांना विविध तक्कारी वादांमुळे विविध कोर्ट केसेस झाल्या. देवस्थानावर अनेक वर्ष कोर्ट रिसीव्हर यांची नेमणुक होती. १२ वर्षाच्या अथक परिश्रमानंतर देवस्थान ट्रस्ट साठी योजना (स्कीम) होऊन उच्च न्यायालय मुंबई यांचे सुचनेनुसार नाशिक जिल्हा न्यायालयाने दि. २० डिसेंबर २०१२ मध्ये ७ विश्वस्तांची नेमणुक केली. आता दर पाच वर्षांची मुदत असलेले विश्वस्त मंडळ कार्यरत असुन माननीय पदसिद्ध जिल्हा न्यायाधिश, नाशिक यांचे अध्यक्षतेखाली माननिय तहसिलदार, नाशिक हे पदसिद्ध विश्वस्त आणि अन्य ५ विश्वस्तांची नेमणुक जिल्हा न्यायालयाकडून केली जाते. अशा प्रकारे सुमारे ४०० वर्षांचा इतिहास श्री क्षेत्र आगरटाकळी मेठ या नोंदणीकृत न्यास देवस्थानाचा आहे.

सन २०१७ मध्ये महाराष्ट्र शासनाचे तत्कालीन पर्यटनमंत्री श्री.जयकुमार रावल तसेच तत्कालीन विद्यमान आमदार प्रा.सौ.देवयानी सुहास फरांदे यांचेकडून रु,३ कोटी ८४ लाख रु.चा परिसर विकास निरधी मिळाला व सहकार्य झाले. मंदिर गाभारा, कळस व अन्य जिणोद्धाराचे कार्य देणगीदार व भाविकांचे सहकार्याने सन २०१७ ते २०२१ या काळात झाले आहे. नोंदणीकृत ट्रस्ट असलेल्या या देवस्थानचा वास्तुशांती, सहस्त्र कुंभाभिषेक व कलशारोहण असा भव्य कार्यक्रम दि. ११ ते १३ डिसेंबर २०२१ (मार्गशीर्ष शु.८ ते मार्गशीर्ष शु.१०) या काळात संपन्न झाला, अशा प्रकारे जेथे नारायण ठोसर यांचे व्यक्तिमत्व श्री समर्थ रामदास स्वामी असे घडले ती पुण्यभूमी म्हणजे श्री क्षेत्र आगरटाकळी येथील श्री मारुती देवस्थान आणि राष्ट्र संत श्री रामदास स्वामी मठ आगरटाकळी, नाशिक आहे. असा श्री क्षेत्र आगरटाकळीचा संक्षिप्त इतिहास आहे.