जगी धन्य ही टाकळी पुण्य भूमी । अनुष्‍ठान केले असे रामनामी । असंख्यात सामर्थ्य गोमय मारुतीचे । गोदा तटी हे स्थान जागृतीचे ॥

उपक्रम

श्री क्षेत्र टाकळी हे श्री समर्थ संप्रदायातील सर्वार्थाने प्रथम क्रमांकाचे स्थान असल्यामुळे येथे होणारे उपक्रम हे प्रथम क्रमांकाचे दर्जेदारच असतील.

* श्री गोमय मारुती मंदिराचा एक उत्कृष्ठ नमुना असेल ह्याप्रमाणे जीर्णोद्धार करणे.

* गोदा-नंदिनीच्या संगमावर भव्य तपश्चर्या स्थान उभारणे.

* गोदावरी काठी मठाच्या मठाधिपतींच्या समाध्या आहेत. त्या संबंधीच्या कायदेशीर अडचणींचे निराकरण करुन त्यांचा
  जीर्णोद्धार व दैनंदिन धार्मिक विधी सुरू करणे.

* श्री समर्थांच्या विचारांचा, शिकवणीचा, रामदासी संप्रदायाच्या पद्धती प्रमाणे प्रचार, प्रसार करावयाचा आहे. त्यासाठी व्यायाम-
   शाळा, गोशाळा, विद्यालय, गुरुकुल, औषधालय, वाचनालय, ह्‍या सर्व माध्यमांचा उपयोग करावयाचा आहे.

* हे सर्व उपक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व भाविकांच्या सहकार्याची आणि आशिर्वादाची नितांत आवश्यकता आहे, आणि तो    मिळणारच असा पूर्ण विश्वास आहे.

श्री समर्थांनी सांगितलेच आहे
केल्याने होत आहेरे । आधी केलेची पहिजे ॥
सरते शेवटी ही पूर्ण श्रद्धा आहे की हे त्यांचेच कार्य आहे आणि तेच करुन घेणार आहेत आम्ही मात्र नाममात्र.