जगी धन्य ही टाकळी पुण्य भूमी । अनुष्‍ठान केले असे रामनामी । असंख्यात सामर्थ्य गोमय मारुतीचे । गोदा तटी हे स्थान जागृतीचे ॥

आपण मंदिरात कसे याल

   नाशिक रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर स्वतंत्र ऑटो केल्यास गांधीनगर वसाहतीचे मागील रस्त्याने मंदिरात आपण येऊशकता. अंतर साधारण ४ कि.मी. आहे.

    स्टेशनवरुन बसने आल्यास व्दारका चौक ( शहिद भगतसिंग चौक) ह्‍या स्टॉपवर उतरुन ५/१० मिनीटे चालून टाकळी फाट्यावर येऊन थेट रिक्षेने (शेअर रिक्षेने) मंदिरात येऊ शकता. साधारण अंतर ३ कि.मी.

रोडमार्गे पुणे, मुंबई ह्‍या दिशेने आल्यास वर नमूद केल्याप्रमाणे व्दारका सर्कल (शहिद भगतसींग चौक) पासून येणे.

धुळे, मालेगाव दिशेने आल्यास व्दारका सर्कल पर्यंत न जाता, अलिकडील टाकळी फाट्यावरुनच येणे.

हवाई मार्गाने यायचे असल्यास पुणे व मुंबई विमानतळावर उतरून रोडमार्गे नाशिकला यावे लागेल.

विषेश माहिती

टाकळी देवस्थान संबंधी सन १६०८ ते २०१२ पर्यंतचा संपूर्ण इतिहास आणि त्या कार्याच्या माहिती संबंधीचे २९६ पाने व ५७
रंगीत चित्रे असलेले पुस्तक मठाचे विश्वस्त श्री. सुधीर शिरवाडकर (रिटायर्ड ऑटोमोबाईल इंजिनिअर) ह्‍यांनी लिहीले आहे. ज्या समर्थ भक्‍तास देवस्थानच्या अधिक माहितीची आवशकता वाटल्यास त्यांनी ह्‍या क्रमांकावर संपर्क साधावा.
लँडलाईन - ०२५३-२४६२१६२ मो.नं. - ९८९०६५४५६३