जगी धन्य ही टाकळी पुण्य भूमी । अनुष्‍ठान केले असे रामनामी । असंख्यात सामर्थ्य गोमय मारुतीचे । गोदा तटी हे स्थान जागृतीचे ॥



कसे याल

देणगी आवाहन

श्री मारुती देवस्थान आणि राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी मठ आगरटाकळी, नाशिक यांचा माहितीपट
संत श्रेष्ठ समर्थ रामदास स्वामी यांच्या 341 व्या पुण्यतिथी

उत्सव


नम्र विनंती

फोटो गॅलरी



आवाहन

टाकळी देवस्थान येथे ज्या भक्तांना रोजचा भंडारा, आठवड्याचा भंडारा, महिन्याचा भंडारा किंवा श्रावण व विशिष्ट पर्वणीचा भंडारा, दास नवमी यादिवशीचे कार्यक्रम आणि रामनवमी ते हनुमान जयंती
                          अधिक वाचा...

श्री समर्थ चरित्र

श्री. सुर्याजीपंत ठोसर आणि त्यांच्या पत्‍नी सौ.राणुबाई हे पती पत्‍नी जांब ता.घनसंघवी जि.जालना ह्या गांवी देव धर्माचे आचरण करीत त्यांना मिळालेल्या बारा गावांचे जोशी व कुलकर्णीपदाचे ससोटीने कार्यरत, गोर गारीबांना यथा सांग मदत करीत. त्यांचा दिनक्रम आनंदाने चालला होता. त्यांच्या घराण्यात २३ पीढ्यांनी सूर्य उपासनेच्या पूण्याईने त्यानां दोन पुत्र झाले. पहिला पुत्र गंगाधर (श्रेष्ट) हा सूर्यनारायणाच्या आशिर्वादाने मार्गशिर्ष व. १३ सन १६०५
                                                                                    अधिक वाचा...

नम्र आवाहन

सन १६३३ मध्ये आगर टाकळी येथे समर्थ रामदास स्वामींनी स्वहस्ते गोमय मारुतीची स्थापना केली. या स्थळाचे पावित्र्य व महात्म्य जपण्यासाठी मंदिराचा जिर्णोद्धार करून मंदिराला पूर्वीचे मूळ रूप प्राप्त करून द्यावयाचे ठरविले आहे. यास्तव आपणास नम्र विनंती करण्यात येते की, आपल्याकडे जय मंदिराचे अथवा परिसराचे पूर्वीचे फोटो अथवा माहिती असेल तर देवस्थानच्या वरील पत्त्यावर किंवा ’श्रीज्योती’ बुक सेलर्स अ‍ॅंड स्टेशनर, जीवनछाया, मुरकुटे कॉलनी, गंगापूर रोड, नाशिक या पत्त्यावर जमा करावीत. आपण आमच्याकडे पाठविलेले छायाचित्र व माहिती संग्रहित करून टाकळी येथे प्रदर्शनात लावण्यात येतील.
नाशिक येथील आगरटाकळी येथे रामदास स्वामींनी गोदावरी-नंदिनी नदीच्या संगमात १२ वर्षे तपश्चर्या केली व स्वहस्ते गोमय मारुतीची स्थापना करुन पहिल्या मठाची स्थापना केली. सन २०१२ मध्ये शासनाने पहिल्यांदा या मठासाठी विश्वस्त मंडळाची नेमणूक केली.
या विश्वस्तांच्या अधिपत्याखाली, मंदिराचा जिर्णोद्धार, संगमावर रामदास स्वामींचे भव्य स्मारक, लाईट साऊंड शो, परिसराचे सुशोभिकरण इ. मंदिराच्या विकासाचे काम करण्यात येत आहे. या कामात लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे. यावस्त आपण वरील आवाहन स्वीकारून सहकार्य करावे ही विश्वस्तांतर्फे नम्र विनंती.

भाविकांना नम्र विनंती

कृपया आपले मारुतीराया, रामराया, समर्थ रामदास तसेच टाकळी मंदिराविषयी आपले स्वानुभव स्वत:च्या फोटो व इतर माहितीसह पाठवावे. आपली प्रार्थना, नवस अथवा साधना यासंदर्भातील आपल्या प्रचितीचे खरेखुरे अनुभव ट्रस्टच्या कार्यालयाच्या पत्त्यावर तपशिलवार फोटो, इमेल, पत्त्यासह पाठवावे. टाकळीसंदर्भात आपल्याकडे जी काही माहिती तसेच पुरातन पुरावे व संदर्भ माहिती असल्यास तेही आमच्याकडे पाठवावे. जेणेकरुन वेबसाईट अद्ययावत करणे सोयीचे होईल.